विविध शारीरिक क्रियांसाठी महत्त्वाचे असलेले हार्मोन्स तयार करणे, रक्तदाब नियंत्रित करणे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे आणि शरीरातील पाण्याची योग्य पातळी राखणे यांसारखी काही महत्त्वाची कामे किडनी करत असते. एवढी सगळी महत्त्वाची कार्ये करत असताना जर किडनीच्या कार्यात काही अडथळा निर्माण होत असेल तर तिच्या कार्यक्षमतेत बाधा येते आणि इथूनच आजाराला सुरुवात होते. जर योग्यवेळी आजाराचे निदान आणि उपचार सुरू झाले नाहीत तर किडनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. या ब्लॉगमध्ये आपण किडनी फेल होणे म्हणजे काय?, किडनी फेल्युअरची कारणे याबद्दल माहिती घेणार आहोत.
सामान्यपणे किडनी शरीरातील नको असलेले घटक मुत्रावाटे बाहेर टाकत असते. जेव्हा किडनीच्या या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि किडनी हे कार्य करण्यास असक्षम होते तेव्हा किडनी फेल झाली असे म्हणतात. मानवाच्या शरीरात दोन किडण्या असतात. एक किडनी फेल झाली तर दुसऱ्या किडनी वर अतिरिक्त भार पडतो आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध आणि पथ्य पाळले नाही तर तीही लवकरच खराब होऊ शकते.
किडनी जेव्हा पूर्वीसारखी कार्यक्षम राहत नाही आणि तिच्या कार्यात अडथळे आल्याने जेव्हा ती निकामी होते तेव्हा किडनी फेल झाली असे म्हणले जाते. या किडनी फेल्युअरची अनेक कारणे आहेत. जसे मद्यपान, धूम्रपान, अनियंत्रित मधुमेह. यांशिवाय अजून कोणत्या कारणांनी किडनी निकामी होऊ शकते हे पाहूया.
जर तुम्हाला उच्च रक्तदाब आणि मधुमेह असेल तर तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे. किडनी रक्त शुद्ध करण्याचे काम करत असते. उच्च रक्तदाबामुळे किडनीवर अतिरिक्त भार येतो. मधुमेहामुळे जर रक्तातील साखर अनियंत्रित असेल तरी किडनीवर दबाव निर्माण होतो.
काहीवेळा किडनी फेल होण्याचे महत्त्वाचे कारण असते ते म्हणजे औषधांचा दुष्परिणाम. प्रोटीनच्या औषधांचे जास्त सेवन, वारंवार घेतली जाणारी वेदनाशामक औषधे यामुळे किडनी निकामी होऊ शकते. वेदनाशामक औषधे घेताना तात्पुरती वेदना तर दूर होते परंतु सतत केलेल्या या औषधांच्या सेवनाने दीर्घकालीन किडनीची समस्या निर्माण होऊ शकते.
कोणताही आजार सुरू होण्याआधी त्याची काही ना काही लक्षणे ही दिसतातच. काहीवेळा अगदी साधी साधी वाटणारी लक्षणे किडनी फेल होण्यासारख्या मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते. बहुतेक वेळा आपल्याला मळमळ, भूक न लागणे, उलट्या, चक्कर, थकवा हे खूप साधे वाटते आणि त्याकडे सहजरीत्या दुर्लक्ष केले जाते. असे केले गेलेले दुर्लक्ष जीवावर बेतू शकते. किडनी फेल होण्याआधी काय संकेत देते हे पाहूया.
कधीतरी धावपळ आणि पुरेशी झोप न झाल्याने नक्कीच थकवा येऊ शकतो पण जर पुरेशी झोप आणि विश्रांती घेऊनही थकवा जाणवत असेल तर नक्कीच हे गंभीर आहे. सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे हे रक्तातील विषारी घटकांमुळे होत असते. आपल्याला माहीत आहेच किडनी रक्त शुद्ध करण्याचे काम करत असते पण जेव्हा किडनीचे कार्य नीट होत नाही तेव्हा हे विषारी घटक रक्तातच राहतात. संपूर्ण शरीरात मग या अशुद्ध रक्ताचे भिसरण होते आणि म्हणूनच थकवा जाणवतो. थकवा जाणवत असल्याने चक्कर देखील येऊ शकते. योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन नक्की थकवा कशामुळे येत आहे याचे निदान करून घ्यावे.
किडनी फेल होत असेल तर शरीरावर सूज देखील दिसून येते. शक्यतो घोटे, गुडघे आणि पायांवर सूज दिसते. अशी सूज दिसण्यामागे कारण म्हणजे किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्याच्या प्रयत्नात असते परंतु किडनीची कार्यक्षमता कमी झाल्याने हे प्रयत्न असफल होतात आणि ते पाणी तिथेच राहते म्हणूनच पायावर सूज दिसते. या सुजेमागचे कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जर किडनी निकामी होण्यासाठी सुरुवात झाली असेल तर लघवीत बदल दिसून येतात. आपण पाहिले आहे की, किडनी आपल्या शरीरातील नको असलेले घटक आणि पाणी फिल्टर करून मुत्रावाटे शरीराबाहेर टाकते. त्यामुळे मूत्रात झालेले बदल म्हणजे किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. कधीकधी औषधांमुळे देखील असे बदल दिसू शकतात मात्र किडनी फेल होत असेल तर सामान्यपणे:-
अशी लक्षणे दिसून येतात. जर लघवीत असे काही बदल जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
इंग्लिश मध्ये एक म्हण आहेच Prevention is better than cure अर्थात संकट आल्यावर त्यावर उपाय करण्यापेक्षा आधीच खबरदारी घ्यावी. किडनी जर आपल्या शरीरातील इतका महत्त्वाचा अवयव असेल तर नक्कीच किडनी सुरक्षेसाठी काही काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो. किडनी नेहमी सुदृढ राहावी यासाठी काही उपाययोजना करता येतात.
१. रक्तदाबावर नियंत्रण:– हाय ब्लड प्रेशरमुळे (उच्च रक्तदाब) किडनीची कार्यक्षमता कमी होते. नियमित व्यायाम करून आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेऊन रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते.
२. वजन नियंत्रित ठेवा:- आपल्या वय आणि उंचीपेक्षा वजन जास्त असेल तर किडनीवर दबाव निर्माण होतो. वजन नियंत्रित असेल तर बरेचशे आजार होत नाहीत.
३. महुमेहावर नियंत्रण:– जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा. वेळेवर औषधे आणि सकस आहार घ्या.
४. डॉक्टरांचा सल्ला:- वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला काही लक्षणे दिसत असतील आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर नवी मुंबई, वाशी येथील Urologist डॉ. निनाद तांबोळी यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता.
आता विज्ञानात बरीच प्रगती झाली आहे आणि त्यामुळे किडनी फेल झाली असेल तरी त्यावर काही उपाय योजना करता येतात. अर्थात नैसर्गिक ते नैसर्गिक परंतु रुग्णाच्या वेदना काही अंशी कमी करण्यासाठी आणि त्याचे आयुष्यमान वाढण्यासाठी नक्कीच हे उपाय कामी येतात. जेव्हा डॉक्टर किडनी फेल झाली आहे असे निदान करतात तेव्हा त्याची तीव्रता आणि रुग्णाचे इतर काही रिपोर्ट्स पाहून पुढची रूपरेषा आखतात. शक्यतो डायलिसिस, किडनी ट्रान्सप्लांट (किडनी प्रत्यारोपण) यांसारखे काही उपाय किडनी फेल झाल्यावर करता येतात.
१. डायलिसिस:- डायलिसिसमध्ये किडनीचे काम मशिनद्वारे केले जाते. या प्रक्रियेत शरीरातील रक्तातील नको असलेले घटक, सोडियम, पोटॅशियम, अतिरिक्त द्रव्य असे सर्व घटक फिल्टर केले जाते.
२. किडनी ट्रान्सप्लांट (किडनी प्रत्यारोपण):- जर रुग्णाच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या असतील तर एखाद्या निरोगी व्यक्तीची किडनी रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण केले जाते. यामुळे रुग्ण पुन्हा पूर्ववत आपले आयुष्य जगू शकतो.
किडनी आपल्या शरीरातील खूप महत्त्वाचा भाग आहे. आपले संपूर्ण आरोग्य किडनीवर अवलंबून असते. किडनी फेल होण्याची जी लक्षणे आहेत ती अगदी साधी वाटत असली तरी अश्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. जर दुर्दैवाने तुमची किडनी निकामी झाले असल्याचे निदान झालेच तरी घाबरून न जाता डॉक्टरांवर विश्वास ठेवून पुढील उपचार करून घ्यावेत. आजच्या प्रगत युगात नक्कीच हे शक्य आहे.
Free Consultation Book Now
About The Urology Clinic Navi Mumbai
The Urology Clinic Navi Mumbai, led by Dr. Ninad Tamboli, a trusted urologist in Navi Mumbai, is your destination for expert urological care. Specializing in advanced treatments for urinary and reproductive health.
We’re here to assist you! Reach out to us for appointments, inquiries, or detailed information about our services: